भजनी मालिका
← भजनांकडे परत

संताचा करी जो अपमान । तोचि जाणावा दुर्जन

santacha kari jo apaman | tochi janava durjan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
संताचा करी जो अपमान । तोचि जाणावा दुर्जन ॥१॥ जन्मोनियां पापराशी । जातो पतना नरकासी ॥२॥ सोडवावया नाहीं कोणी । पडती चौर्‍यांशी पतनीं ॥३॥ एका जनार्दनीं शरण । ऐसा अभागी खळ जाण ॥४॥