भजनी मालिका

भजने

संकोचतो जीव महत्वाच्या भारें । दासत्व चि बरें बहु वाटे ॥१॥ कळावी जी माझी आवडी हे संतां । देणें तरि आतां हें चि द्यावें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

संकोचोनि काय झालासी लहान । घेई अपोशण ब्रम्हांडाचें ॥१॥ करोनि पारणें आंचवें संसारा । उशीर उशिरा लावूं नको ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सक्षत्वे जीत त्याचा होय अंत । विचारें मुरत वस्तुमाजीं ॥१॥ पिंडीचें ते दोन्हीं ब्रह्माडींचे दोन्हीं । हे प्रळय पुराणीं बोलिलेती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सखी पुसे सखियेसी । युगें जालीं अठ्ठावीसी । उभा ऐकिला संतामुखीं । अद्यापीं वर । कटावरी कर । भीवरी तीर । वाळूवंटीं संतसभा सभा ॥१॥

रचनाकार: संत एकनाथ

सखीये अनुतापें वैराग्यतापें अति संतप्त नयनीं । अश्रु अंगीं स्वेद रोमांच जीवीं जीव मूर्च्छित वो ॥१॥ माझें मजलागीं गुरुकृपा मन तें जालें उन्मन वो । देही देह कैसा विदेह जालें क्रिया चैतन्यघन वो ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

संगती बावनाचें रावलों सर्व भावें । चंदन होऊनी सवें ठेलों मी वो ॥१॥ वेधिला जीव माझा संतचरणीं । आन दुजें मना नाठवेचि स्वप्नी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ