भजनी मालिका
← भजनांकडे परत

संत ऐकती निवाडें । बैसोनि पुढें गुणतुमचे

sant aikati nivaden | baisoni pudhen gunatumache

रचनाकार: संत निळोबा · अभंग
संत ऐकती निवाडें । बैसोनि पुढें गुणतुमचे ॥१॥ तैसेचि गाऊं तयांपासीं । आर्त मानसीं धरुनियां ॥२॥ जया जेथें पडेल रुची । बोलों तैसेचि सारांश ॥३॥ निळा म्हणे अपार पेणें । वोळलें देणें तुमचें हरी ॥४॥