भजनी मालिका
← भजनांकडे परत

संत देखोनियां स्वयें दृष्टी टाळी । आदरें न्याहाळी परस्त्रीसी

sant dekhoniyan svayen drushti tali | adaren nyahali parastrisi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
संत देखोनियां स्वयें दृष्टी टाळी । आदरें न्याहाळी परस्त्रीसी ॥१॥ वीट ये कर्णासी संतवाक्यामृता । स्त्रीशब्द ऐकतां निवे कर्ण ॥ध्रु.॥ कथेमाजी निज वाटे नित्यक्षणीं । स्त्रियेचे कीर्तनीं प्रेमें जागे ॥२॥ तुका म्हणे तुम्ही क्रोधासी न यावें । स्वभावा करावें काय कोणीं ॥३॥