भजनी मालिका

भजने

संगतीनें होतो पंगतीचा लाभ । अशोभीं अनुभव असिजेतें ॥१॥ जैसीं तैसीं असों पुढिलांचे सोई । धरिती हातीं पायीं आचारिये ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सगुण चरित्रें परम पवित्रें सादर वर्नावी । सज्जनवृदें मनोभावे आधीं वंदावीं ॥१॥ संतसंगे अंतरंगे नाम बोलावें । कीर्तनरंगें देवा सन्निध सुखें डोलावें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सगुण तें ब्रह्म विटेवरी नीट । कोण्या प्राणीं कष्ट होऊम नेदी ॥१॥ देऊनियां क्षेम देहू पालटिसी । वृद्ध रूप होसी कर्णसाठीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

सगुण निर्गुण कल्पनेचा भास । वस्तु अविनाश व्यापकत्वें ॥१॥ स्वानुभवें पाहीं लटिकें साच नाहीं । परिपूर्ण अवघाही आत्माराम ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

सगुण निर्गुण नोहे वृक्ष । पाहतां नित्रीं न भासे सादृश्य । देखतां देखत होतो अदृश्य ॥१॥ सांग रे कान्होबा हें कोंडे । तुझें तुजपाशीं केलें उघडें । आम्हां न कळे वाडेंकोडें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सगुण निर्गुण बुंथींचे आवरण । ब्रह्मा सनातन पंढरीये ॥१॥ तो हा श्रीहरीं नंदाचा खिल्लरी । योगी चराचरीं ध्याती जया ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सगुण निर्गुण मूर्ति उभी असे विटे । कोटी सुर्य दांटे प्रभा तेथें ॥१॥ सुंदर सगुण मूर्ति चतुर्भुज । पाहतां पूर्वज उद्धरती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सगुण रूपडें अद्वैत बुंथी । घेऊनि पंढरपुरी उभा विटे ॥१॥ डोळियांची धणी पहातां न पुरे । मनचि चांचरे पाहतां पाहतां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सगुण संपन्न पंढरीच्या राया । आमुच्या स्वामिया केशिराजा ॥१॥ रामकृष्ण हरी श्रीधरा मुकुंदा । सज्जनीं स्वानंदा सर्वातीता ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

सगुन समान भजती अंतरीं । सर्व भूतांतरीं असे एक ॥१॥ पाहा कोळियांची काय सांगों कीर्ति । विद्या अभ्यासिती मूर्तिपुढें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव