भजनी मालिका
← भजनांकडे परत

व्यक्त अव्यक्तीचें रूपस मोहाचें

vyakta avyaktichen rupas mohachen

व्यक्त अव्यक्तीचें रूपस मोहाचें। एकतत्त्व दीपाचें हृदयीं नांदे ॥१॥ चांगवा फावलें फावोनी घेतलें। निवृत्तीनें दिवले आमुच्या करीं ॥२॥ आदि मध्य यासी सर्वत्र निवासी । एक रूपें निशी दवडितु ॥३॥ मुक्ताई पूर्णता एकरूपें चित्ता । आदि अंतु कथा सांडियेली ॥४॥