भजनी मालिका
← भजनांकडे परत

व्दारकेचि मूर्ती एकनाथा घरी । पाणी वाहे हरि कावडीने

vdarakechi murti ekanatha ghari | pani vahe hari kavadine

रचनाकार: संत निळोबा · अभंग
व्दारकेचि मूर्ती एकनाथा घरी । पाणी वाहे हरि कावडीने ॥१॥ श्रीखंडया चंदन उगाळूनि करी । वस्त्र गंगातीरी धूत असे ॥२॥ सेवेसी तत्पर उभा ठायी ठायी । देवपूजेसमयी तिष्ठतसे ॥३॥ निळा म्हणे देव रावे ज्याचे घरी । दत्तचोपदारी करितसे ॥४॥