भजनी मालिका
← भजनांकडे परत

व्यर्थ या व्युत्पत्ति लवितोसी श्रुति । विषयांची तृप्ति काय चाड

vyartha ya vyutpatti lavitosi shruti | vishayanchi trupti kay chad

रचनाकार: संत नामदेव · अभंग
व्यर्थ या व्युत्पत्ति लवितोसी श्रुति । विषयांची तृप्ति काय चाड ॥१॥ मायेचा हा फांसा मोहजाळ सोसा । वांयां कासा-विसा होसी झणीं ॥२॥ टाकीं टाकीं असत्य विठ्ठल हेंचि सत्य । होईल सर्व कृत्य एका नामें ॥३॥ नामा म्हणे दैवत एक तो अच्युत । सांगितलें हित खेचर विसें ॥४॥