भजनी मालिका
← भजनांकडे परत

वोसंडोनी हरि आनंदला तेथें । पुण्य हें अगणित सांगितलें

vosandoni hari anandala tethen | punya hen aganit sangitalen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
वोसंडोनी हरि आनंदला तेथें । पुण्य हें अगणित सांगितलें ॥१॥ सर्वांगालागीं न्याहाळिलें परिपूर्ण । केलें निंबलोण आवडीनें ॥२॥ आळंकापुरीं कोणी करील कीर्तन । तयालागीं येणें वैकुंठीचें ॥३॥ अस्ति नास्ति उदकीं करिल ब्रह्मरुप । कोटी कुळांसहित उद्धरीन ॥४॥ जेथें ज्ञानदेव तेथें मी निशिदिनीं । येथें सुखें ज्ञानी डुल्लताती ॥५॥ नामा म्हणे आतां वोसंडले हरी । जडमूढावरी कृपा केली ॥६॥