भजनी मालिका
← भजनांकडे परत

वोल्हावले मन परतोनो पाही

volhavale man paratono pahi

वोल्हावले मन परतोनो पाही । तंव प्रपंच दिसे आया गेले । पिटुनी बाह्या वैराग्याची गुढी । उभऊनी म्हणे म्यां जिंकिलें ॥ पपर न दिसे शेखी । चरणी स्थिरावलें । जळतरंग लहरी । सरिता संगम जीवनीं । जीवन ऐक्य ठेलें रया ॥ तेंचि ब्रह्मज्ञान बोधिता पाहातां । सगुण निर्गुण आता भेदु नाहीं । वाउगाचि शिणसी विचारी मानसीं । वायां कल्पना करूनि दाही दिशी रया ॥ हणोनि तंतु ओतप्रोत होतु । तैसे विश्वजात ब्रह्मी असे ॥ तीं कल्पिसी भेद सगुण निर्गुण । तेणे कल्पने प्रत्यया नये । सर्वस्वे उदासीन होई तुं निश्चय । जाण एक सगुणींचि काय न लभे रया ॥ म्हां सगुण निर्गुण समान । नेणो जन्म जातक भान । दृश्य द्रष्टा दर्शन । त्रिपुटी नलगे । महावाक्यादि शब्द । तत्त्वमस्यादि बोध । हेही आम्हा सकळ वाउगें रया । बापरखुमादेविवरू विठ्ठलु चिंतितां । सुख सगुणींच जोड़े येणें अंगे रया ॥