भजनी मालिका
← भजनांकडे परत

व्यर्थ कां हव्यासीं करिसी परोपरी । नाम निरंतरीं न म्हणा कां रे

vyartha kan havyasin karisi paropari | nam nirantarin na mhana kan re

रचनाकार: संत नामदेव · अभंग
व्यर्थ कां हव्यासीं करिसी परोपरी । नाम निरंतरीं न म्हणा कां रे ॥१॥ आयुष्य जाईल क्षणांत सरोन । पावसी पतन कुंभिपाकीं ॥२॥ नाम संकीर्तन नाइके स्वभावें । प्रत्यक्ष तें शव ज-गामाजीं ॥३॥ नामा ह्मणे ऐसे गेले बहुतेक । सांगें सकळिकां हेंचि आतां ॥४॥