भजनी मालिका
← भजनांकडे परत

व्यापक जनार्दनीं व्यापूनि राहिला । अखंड भरला ह्रुदयसंपुटीं

vyapak janardanin vyapuni rahila | akhand bharala hrudayasamputin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
व्यापक जनार्दनीं व्यापूनि राहिला । अखंड भरला ह्रुदयसंपुटीं ॥१॥ पाहतां पाहणें परतें गेलें दुरी । अवघा चराचरीं जनार्दन ॥२॥ व्यापक व्यापला अक्षयी संचला । भरूनी उरला जळीं स्थळीं ॥३॥ एका जनार्दनीं रिता नाहीं ठाव । अवघा देहीं देव जनार्दन ॥४॥