भजनी मालिका
← भजनांकडे परत

वैष्णवाघरीं देव सुखावला । बाहिर नवजे दवडोनि घातिला

vaishnavagharin dev sukhavala | bahir navaje davadoni ghatila

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वैष्णवाघरीं देव सुखावला । बाहिर नवजे दवडोनि घातिला ॥१॥ देव म्हणे माझें पुरतसें कोड । संगती गोड या वैष्णावांची ॥२॥ जरी देव नेउनी घातिला दुरी । परतोनि पाहे तंव घराभीतरीं ॥३॥ कीर्तनाची देवा आवडी मोठी । एका जनार्दनीं पडली मिठी ॥४॥