भजनी मालिका
← भजनांकडे परत

वोडवोनि मान आला रायापाशीं । निर्भय मानसीं धर्मांगद

vodavoni man ala rayapashin | nirbhay manasin dharmangad

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वोडवोनि मान आला रायापाशीं । निर्भय मानसीं धर्मांगद ॥१॥ घेऊनियां शस्त्र स्मरला अच्युत । उभारिला हात मारावया ॥२॥ अंतकाळीं केल्या देवाचें स्मरण । तेव्हा नारायण धांव घाली ॥३॥ धरियेला हात माथां ठेवी कर । म्हणे माग वर मज कांहीं ॥४॥ एका जनार्दनीं नाम आलें मुखा । पांडुरंग सखा होय त्याचा ॥५॥