भजनी मालिका
← भजनांकडे परत

वैष्णवा भुषण मुद्रांचें श्रृंगार । तुळशी परिकर वाहती कंठीं

vaishnava bhushan mudranchen shrrungar | tulashi parikar vahati kanthin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वैष्णवा भुषण मुद्रांचें श्रृंगार । तुळशी परिकर वाहती कंठीं ॥१॥ तयांचियां पायीं माझा दंडवत । सदा जे जपत नाम मुखीं ॥२॥ आसनीं शयनीं भोजनीं नित्यता । स्मरणी जे तत्त्वतां रामनाम ॥३॥ पुण्यपावन देह जन्माचें सार्थक । एका जनार्दनीं कौतुक त्याचे मज ॥४॥