भजनी मालिका
← भजनांकडे परत

वैष्णवांचा मेळा सकळ मिळाला

vaishnavancha mela sakal milala

वैष्णवांचा मेळा सकळ मिळाला । विठ्ठलनामकाला पंढरीसी ॥ १ ॥ हरिनामा विनट हरि उच्चारीत । सप्रेम डुल्लत भक्तजन ॥ २ ॥ चालिला सोपान ज्ञानदेव निधी । मुक्ताई गोविंदीं तल्लीनता ॥ ३ ॥ निवृत्ति खेचर परसा भागवत । आनंदे डुल्लत सनकादीक ॥ ४ ॥