भजनी मालिका
← भजनांकडे परत

वोडविलें अंग । आतां करूनि घ्यावें सांग

vodavilen ang | atan karuni ghyaven sang

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वोडविलें अंग । आतां करूनि घ्यावें सांग ॥१॥ काय पूजा ते मी नेणें । जाणावें जी सर्वजाणें ॥ध्रु.॥ पोटा आलें बाळ। त्याचें जाणावें सकळ ॥२॥ तुका म्हणे हरी । वाहावें जी कडियेवरी॥३॥