भजनी मालिका
← भजनांकडे परत

वोरसोनि येती । वत्सें धेनुवेच्या चित्तीं

vorasoni yeti | vatsen dhenuvechya chittin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वोरसोनि येती । वत्सें धेनुवेच्या चित्तीं ॥१॥ माझा कराया सांभाळ । वोरसोनियां कृपाळ ॥ध्रु.॥ स्नेहें भूक तहान । विसरती झाले सीण ॥२॥ तुका म्हणे कौतुकें । दिलें प्रेमाचें भातुकें॥३॥