भजनी मालिका
← भजनांकडे परत

वैष्णव वसती जये स्थाळीं । तेथें धुमाकुळ कथेची

vaishnav vasati jaye sthalin | tethen dhumakul kathechi

रचनाकार: संत निळोबा · अभंग
वैष्णव वसती जये स्थाळीं । तेथें धुमाकुळ कथेची ॥१॥ विठठल देव नाचे उभा । दाटे सभा संतांची ॥२॥ सुखी होती महानुभाव । पावती ठाव तत्पदीं ॥३॥ निळा म्हणे नारी नर । होती तत्पर परमार्थी ॥४॥