भजनी मालिका

भजने

विठ्ठल नाहीं ज्या ठाउका । परमार्थचि त्याचा लटिका ॥१॥ करितो तें पोटासाठीं । बाष्कळ अवघीच चावटी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

विठ्ठल पंढरपुर निवासी । विठ्ठल उभा भिवरेसी । विठ्ठल पुंडलिकापाशीं । भक्ति प्रेमेशीं तिष्ठत ॥१॥ जाई जाई मना तेथें । सुखें वैष्णव नाचती जेथें । ब्रह्मानंदपद दरुशनमात्रें । देत आहे भक्तांसी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

विठ्ठल भीमातीरवासी । विठ्ठल पंढरीनिवासी । विठ्ठल पुंडलिकापासीं । कृपादानाविसीं उदार ॥१॥ विठ्ठल स्मरणा कोंवळा। विठ्ठल गौरवीं आगळा । आधार ब्रम्हांडा सकळा । विठ्ठल लीळाविग्रही ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

विठ्ठल माउली कृपेचि सावली । आठवितां घाली प्रेम पान्हा ॥१॥ न सांगतां सर्व जाणे तान्ह भूक । जवळी व्यापक न विसंबे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

विठ्ठल माउली कृपेची कोंवळी । आठवितां घाली प्रेमपान्हा ॥१॥ मज कां मोकलिलें कवणा निरविलें । कठिण कैसें जालें ह्रदय तुझें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

विठ्ठल माझा जीव विठ्ठल माझा भाव । कुळधर्म देव विठ्ठल माझा ॥१॥ विठ्ठल माझा गुरु विठ्ठल माझा तारूं । उतरील पारु भवनदीचा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

विठ्ठल मूर्ति पाहतां दिठीं । पळती कोटी पापांच्या ॥१॥ मग तो आविर्भवे अंतरीं । दिसे बाहेरी चहूंकडे ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

विठ्ठल म्हणतां विठ्ठलाचि होसी । संदेह येविशीं धरुं नको ॥१॥ सागरीं उठती नाना पईं तरंग । सिंधु तो अभंग विठ्ठल एक ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

विठ्ठल रुक्मिणी राहीं सत्यभामा एकरुपी परमात्मा पंढरीये ॥१॥ कैवल्य उघडें क्षीरसागर निवासी । तपें पुंडलिकासे वश्य जाहिलें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

विठ्ठल विठ्ठल म्हणतां वाचे । स्वरुप त्याचें आठवे ॥१॥ शामसुंदर कटीं कर । रुप मनोहर तेजस्वी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

विठ्ठल विठ्ठल म्हणोनी छंदें । ब्रम्हानंदें नाचेन ॥१॥ धरुनियां दृष्टीपुढें । रुप चोखडें सुरेख ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

विठ्ठल विठ्ठल येणें छंदें । ब्रह्मानंदें गर्जावें ॥१॥ वाये टाळ टाळ्याटाळी । होईल होळी विघ्नांची ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम