भजनी मालिका
← भजनांकडे परत

विठ्ठल नावाडा फुकाचा । आळविल्या साटीं वाचा

viththal navada phukacha | alavilya satin vacha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
विठ्ठल नावाडा फुकाचा । आळविल्या साटीं वाचा ॥१॥ कटीं कर जैसे तैसे । उभा राहिला न बैसे ॥ध्रु.॥ न पाहे सिदोरी । जाती कुळ न विचारी ॥२॥ तुका म्हणे भेटी । हाका देतां उठाउठीं ॥३॥