भजनी मालिका
← भजनांकडे परत

विठ्ठल माउली कृपेचि सावली । आठवितां घाली प्रेम पान्हा

viththal mauli krupechi savali | athavitan ghali prem panha

रचनाकार: संत नामदेव · अभंग
विठ्ठल माउली कृपेचि सावली । आठवितां घाली प्रेम पान्हा ॥१॥ न सांगतां सर्व जाणे तान्ह भूक । जवळी व्यापक न विसंबे ॥२॥ माया मोह कैसा करावा सर्वथा । अंतरींची व्यथा तोचि जाणे ॥३॥ सुखशांति रूपें लेवविली अंगीं । लागों नेदी धगी संसाराची ॥४॥ देऊनि अभय करें कुरवाळी । करित सावली पितांबरें ॥५॥ मुखीं नाम माळा कीर्तन श्रवणीं । लेवविलीं लेणीं नवविध ॥६॥ नयनीं अंजन सूदलें सांवळें । समाधान झालें सर्व अंग ॥७॥ अच्युत अनंत सुवर्णाची पेटी । घातलिसे कंठीं निर्वि-कार ॥८॥ चतुर्भुज शोभा रूप मध्यें मणि । प्रभा त्रिभुवनीं विरा- जित ॥९॥ मुक्तलग शुद्ध बिंदुली गोजिरीं । पद्महस्त शिरीं स्थापि-तसे ॥१०॥ संत पायरज कपाळीं टिळका । नाहीं भय शंका कळिकाळा ॥११॥ सगुण साजिरा कटीं कडदोरा । अवर्ण दुर्भरा दृढबोधु ॥१२॥ काम क्रोधादिक करूनि पुतळे । पाय जे घातले पायवाट ॥१३॥ वासनेची दृष्टि लागएल त्या झणीं । उभा चक्रपाणि मागें पुढें ॥१४॥ संतपायीं नामा शृंगार मंडितु । अखंड क्रीडतु महाद्वारीं ॥१५॥