भजनी मालिका
← भजनांकडे परत

विठ्ठल म्हणतां विठ्ठलाचि होसी । संदेह येविशीं धरुं नको

viththal mhanatan viththalachi hosi | sandeh yevishin dharun nako

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
विठ्ठल म्हणतां विठ्ठलाचि होसी । संदेह येविशीं धरुं नको ॥१॥ सागरीं उठती नाना पईं तरंग । सिंधु तो अभंग विठ्ठल एक ॥२॥ तैसे मन करी द्वैत न धरी । सर्व चराचरी विठ्ठल एक ॥३॥ एका जनार्दनी विठ्ठलावांचुनी । दुजा नेणो कोणी स्वप्नी आम्हीं ॥४॥