भजनी मालिका

भजने

विठ्ठलेंविण जया न गमे एक घडी । सर्वस्व आवडी विठ्ठालाची ॥१॥ विठ्ठालचि माता विठ्ठालचि पिता । भगिनी आणि भ्राता विठ्ठालचि ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

विठ्ठाल विसांवा सकळिकां । विठ्ठाल आधार तिही लोकां । विठ्ठाल नकळे ब्रह्मांदिकां । विठ्ठाल रेखा पंढरीये ॥१॥ विठ्ठाल डोळस सांवळा । विठ्ठाल धरारे मानसीं । विठ्ठाल सोडवील अहर्निशीं । विठ्ठालावीण मुक्ति कैंची । कुंटणी गणिकेसी उद्धरिलें ॥३॥

रचनाकार: संत नामदेव

विदयामानें गर्वताठा । धरुनि प्रतिष्ठा वाढविती ॥१॥ नेणती जेणें देव हातीं । लागे ते युक्ति हारविली ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

विदेहदेह विस्मृति पावले । देहादेहीं फिटलें द्वैताद्वैत ॥१॥ ऐसें जनार्दनें उघड दाविलें । देहींच आटलें देहपण ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

विद्या अल्प परि गर्वशिरोमणि । मजहुनि ज्ञानी कोणी आहे ॥१॥ अंगीं भरे ताठा कोणाते मानीना । साधूची हेळणा स्वयें करी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

विधिनिषेध धरितां मनीं । सहजें कार्य होय हानीं ॥१॥ जें जें वेळे जें जें घडे । विधिनिषेध सर्व जोडे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

विधियुक्त नोहे संध्यास्नान । तेणें घडें पतन कल्पकोटी ॥१॥ रेचक पूरक कुंभक ब्रहाटक । प्राणायाम देखन साधेचि ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

विधियुक्त पाणिग्रहण पैं जाहलें । जामातालागीं वहिलें काय बोले ॥१॥ तुम्ही हरिभक्त दुजा नाहीं भाव । चालवा गौरव उभयतां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

विधी वेद विरुद्ध संपर्क संबंध । नाहीं भेदाभेद स्वस्वरुपीं ॥१॥ अविधि आचरण परम दूषण । वेदोनारायण बोलियेला ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

विनंति घातली अवधारीं । मज देई वो अभय करीं । पीडिलों खेचरीं । आणीक वारी नांवांची ॥१॥ रंगा येई वो । एकला रंग वोढवला । हरीनामें उठिला । गजर केला हाकारा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

विनविति संत आणिक सज्जन । नव्हे समाधान कांहीं केल्या ॥१॥ नानाचि प्रकार करितसे घोर । कांहीं केल्या स्थिर चित्त नव्हे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव