भजनी मालिका
← भजनांकडे परत

विठ्ठल पै सार हा जपु आमुचा

viththal pai sar ha japu amucha

रचनाकार: संत सोपान · अभंग
विठ्ठल पै सार हा जपु आमुचा । आणि त्या शिवाचा नित्यनेमु ।।१।। गोविंद श्रीहरि हेचि तो उच्चारी । शिव वराचरी आत्माराम ।।२।। नामेविण नेणे दुनियाची मातु । गोविंद स्मरतु शिवराणा ॥३॥ सोपान धारणा गोविंद पाठाची । कोटि पै कुळाची कुळवडी ।।४।।