भजनी मालिका
← भजनांकडे परत

विठ्ठल विठ्ठल गजरीं । अवघी दुमदुमली पंढरी

viththal viththal gajarin | avaghi dumadumali pandhari

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
विठ्ठल विठ्ठल गजरीं । अवघी दुमदुमली पंढरी ॥१॥ होतो नामाचा गजर । दिंडया पताकांचा भार ॥२॥ निवृत्ती ज्ञानदेव सोपान । अपार वैष्णव ते जाण ॥३॥ हरीकीर्तनाची दाटी । तेथें चोखा घाली मिठी ॥४॥