भजनी मालिका
← भजनांकडे परत

विठ्ठल माझा जीव विठ्ठल माझा भाव । कुळधर्म देव विठ्ठल माझा

viththal majha jiv viththal majha bhav | kuladharma dev viththal majha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
विठ्ठल माझा जीव विठ्ठल माझा भाव । कुळधर्म देव विठ्ठल माझा ॥१॥ विठ्ठल माझा गुरु विठ्ठल माझा तारूं । उतरील पारु भवनदीचा ॥ध्रु.॥ विठ्ठल माझी माता विठ्ठल माझा पिता । विठ्ठल चुलता बहिणी बंधु ॥२॥ विठ्ठल हे जन विठ्ठल माझें मन । सोईरा सज्जन विठ्ठल माझा ॥३॥ तुका म्हणे माझा विठ्ठल विसावा । त्वरित गांवा जाइन त्याच्या ॥४॥