भजनी मालिका

भजने

विठो सांपडावया हातीं । ठावी झाली एक गती । न धरीं भय चित्तीं । बळ किती तयाचें ॥१॥ लागे आपण चि हातीं । किंव भाकावी काकुलती । करी मग चित्तीं । असेल तें तयाचें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

विठोबा पाहुणा आला आमुचे घरा । निंबलोण करा जीवें भावें ॥१॥ पंचप्राण ज्योती ओंवाळुनी आरती । ओंवाळीला पती रखुमाईचा ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

विठोबा मला मूळ धाडा । धांवत येईन दुडदुडां चरणीं लोळेन गडबडा । माझा जीव झाला वेडा || १|| कर ठेवुनि कटावरी उभा राहिला विटेवरी। मुगुट घातला सरीं। कलगी खोविली वरी॥२॥

रचनाकार: संत जनाबाई

विठोबा विठोबा नामोच्चार गोड । सरे येथें चाड सकळिकांची ॥१॥ गात्य आईकत्या एकचि नव्हाभ्र । वैकुंठ राउळीं वसावया ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

विठोबाचें नाम ज्याचे मुखीं नित्य । त्या देखिल्या पतित उद्धरती ॥१॥ विठ्ठलविठ्ठल भावें म्हणे वाचे । तरी तो काळाचे दांत ठेंची ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

विठोबाचे पाय जन्मोनि जोडावे । संबंधी तोडावे कामक्रोध ॥१॥ ऐक्य सुख घ्यावें एकविध भावें । प्रेम न संडावें आवडीचें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

विठोबाचे पाय राहो अखंड चित्ती । अखंड श्रीपती हेचि द्यावे ॥१॥ ध्यानीं मनीं वनीं असता सर्व काळ । साधी काळ वेळ याचि परी ॥२॥

रचनाकार: संत सावता

विठोबाच्या गांबा जाईन धांवोनी । घालीन लोळणी चरणांवरी ॥१॥ शिणभाग द्रवाळिला म्हणेल । जीविंचें पुसेल जड-भारी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव