भजनी मालिका
← भजनांकडे परत

विठ्ठल माझी माय । आम्हां सुखा उणें काय

viththal majhi may | amhan sukha unen kay

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
विठ्ठल माझी माय । आम्हां सुखा उणें काय ॥१॥ घेतों अमृताची धनी । प्रेम वोसंडलें स्तनीं ॥ध्रु.॥ क्रीडों वैष्णवांच्या मेळीं । करूं आनंदाच्या जळीं ॥२॥ तुका म्हणे कृपावंत । ठेवीं आम्हांपाशीं चित्त ॥३॥