भजनी मालिका
संत सावता

संत सावता

इन संत के भजन

उठोनी प्रातःकाळीं करूनियां स्नान । घालुनि आसन यथाविधी ॥ १ ॥ नवज्वरें देह जाहालासे संतप्त । परि मनीं आर्त विठोबाचें ॥ २ ॥

रचनाकार: संत सावता

कां गां रुसलासी कृपाळूं बा हरी । तुजविण दुसरी भक्ती नेणे ॥ १ ॥ दीन रंक पापी हीन माझी मती । सांभाळा श्रीपती अनाथनाथा ॥ २ ॥

रचनाकार: संत सावता

नको तुझें ज्ञान नको तुझा मान । माझें आहे मन वेगळेची ॥ १ ॥ नको तुझी भुक्ती नको तुझी मुक्ति । मज आहे विश्रांती वेगळीच ॥ २ ॥

रचनाकार: संत सावता

नामाचिया बळें न भीऊं सर्वथा । कळिकाळाच्या माथा सोटे मारूं ॥ १ ॥ वैकुंठीचा देव आणूं या कीर्तनीं । विठ्ठल गाऊनी नाचो रंगीं ॥ २ ॥

रचनाकार: संत सावता

पैल पहाहो परब्रह्म भुललें । जगदीश कांहो परतंत्र झालें ॥ १ ॥ काया सुख केलें येणें नेणिजे कोण भाग्य गौळीयाचें वर्णिजे ॥ २ ॥

रचनाकार: संत सावता

मागणें तें आह्मा नाहीं हो कोणासी । आठवावें संतासी हेंचि खरें ॥ १ ॥ पूर्ण भक्त आह्मां ते भक्ती दाविती । घडावी संगती तयाशींच ॥ २ ॥

रचनाकार: संत सावता

माझी हीन याती माझी हीन याती। तुम्ही उदार श्रीपती ॥१॥ नका देऊ भक्ती मुक्ती । माझी परिसावी विनंती ॥२॥

रचनाकार: संत सावता

विकासिला नयन स्फुरण आलें बाहीं । दाटले ह्रदयीं करुणाभरितें ॥ १ ॥ जातां मार्गी भक्त सावता तो माळी । आला तया जवळी पांडुरंग ॥ २ ॥

रचनाकार: संत सावता

विठोबाचे पाय राहो अखंड चित्ती । अखंड श्रीपती हेचि द्यावे ॥१॥ ध्यानीं मनीं वनीं असता सर्व काळ । साधी काळ वेळ याचि परी ॥२॥

रचनाकार: संत सावता

शिव ब्रम्हां विष्णू तिन्ही देव एक । जे निराकार सम्यक विठ्ठल माझा ॥१॥ विठ्ठल नामाचा महिमा अगाध । होणे पुर्ण बोध ऐशा परी ॥२॥

रचनाकार: संत सावता

समयासी सादर व्हावें । देव ठेविले तैसें रहावें ॥धृ०॥ कोणे दिवशीं बसून हत्तीवर । कोणे दिवशीं पालखी सुभेदार ।

रचनाकार: संत सावता