भजनी मालिका
← भजनांकडे परत

विठोजी म्हणे ज्ञानदेवा । तुझी विश्रांति मन ठेवा

vithoji mhane dnyanadeva | tujhi vishranti man theva

रचनाकार: संत नामदेव · अभंग
विठोजी म्हणे ज्ञानदेवा । तुझी विश्रांति मन ठेवा । ते मुराली आमुचिया भावा । निःसंदेहें ॥१॥ कैसें समाधान ज्ञानदेवा । आळंकापुरीं समाधि ठेवा । विठठल ओळला वोल्हावा । नित्यरुपसमाधि ॥२॥धृ०॥ संत करिती महा खेद । म्हणती ज्ञानांजन उद्धोध । मग चालिले विद्‌गद । आळंकापुरीसी ॥३॥ महावल्ली वृक्ष अजान । तो निक्षेपिला पूर्णधन । मग विठोजी म्हणे आपण । ज्ञानदेवासी ॥४॥ धन्य धन्य ज्ञानेश्वरा । पुण्यभूमि समाधि स्थिरा । कृष्ण-पक्षीं तुज निर्धारा । भेट देत जाईन ॥५॥ कार्तिक मास शुद्ध एकादशी । पंढरीयात्रा होईल सरिशी । दुसरी कृष्णपक्षीं निर्धारेंसी । तुज दिधली असे ॥६॥ हें ऐकोनि संत-जनीं । जयजयकार केला ध्वनी । दिंड्या पताका मेळ गगनीं । देव सुमनें वर्षताती ॥७॥ नामा म्हणे आले विष्णव । आलंकापुरीं मिळाले सर्व । समाधिं सुखी ज्ञानदेव । बैसते जाहले ॥८॥