भजनी मालिका
← भजनांकडे परत

विठो माझा लेंकुरवाळा । संगें लेंकुरांचा मेळा

vitho majha lenkuravala | sangen lenkurancha mela

रचनाकार: संत नामदेव · अभंग
विठो माझा लेंकुरवाळा । संगें लेंकुरांचा मेळा ॥१॥ निवृत्ती हा खांद्यावरी । सोपानाचा हात घरी ॥२॥ पुढें चाले ज्ञानेश्वर । मागें मुक्ताई सुंदर ॥३॥ गोरा कुंभार मांडिवरी । चोखा जीवा बरोबरी ॥४॥ वंका कडियेवरी । नामा करांगुळी धरी ॥५॥ जनी म्हणे गोपाळा । करी भक्तांचा सोहळा ॥६॥