भजनी मालिका
← भजनांकडे परत

विठोबा मला मूळ धाडा । धांवत येईन दुडदुडां चरणीं लोळेन गडबडा । माझा जीव झाला वेडा

vithoba mala mul dhada | dhanvat yein dudadudan charanin lolen gadabada | majha jiv jhala veda

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
विठोबा मला मूळ धाडा । धांवत येईन दुडदुडां चरणीं लोळेन गडबडा । माझा जीव झाला वेडा || १|| कर ठेवुनि कटावरी उभा राहिला विटेवरी। मुगुट घातला सरीं। कलगी खोविली वरी॥२॥ पितांबर नेसूनियां पिवळा गळां में तुळसीच्या माळा । कीं रूप सुंदर सांवळा तेज झळके झळाळा ||३|| नामदेवाचें कौतुक मला सांपडलें माणीक विठोबा पाहुनी तुझें मुख। हारपली माझी तहानभूक ॥४॥ विठोबा तुझी संगत बरी जैसा चंदन मैलगिरी। संत चालले पंढरी निशाण पताका जरतारी||५|| जसी मोहोळासी लुब्ध मासी । तसी तूं सखी माझी होसी सुख दुःख सांगेन तुजपासी माझा जीव होईल खुषी ||६|| काली मध्यान रात्र झाली फेरी विठ्ठलाची आली जनी म्हणे चूक पडली भेट नाही विठ्ठलाची झाली ॥७॥