भजनी मालिका
← भजनांकडे परत

विठो सर्वांचा भार

vitho sarvancha bhar

रचनाकार: संत बोधले · अभंग
विठो सर्वांचा भार । हृदयी घ्या रे निरंतर ॥१॥ विठोबा हा काळाचा काळ । महा भलासि कृपाळ ॥२॥ सत्य वचन निर्धार । शरण जावे रघुवरा ॥३॥ बोधला म्हणे हे सती । साक्षे रखुमाईचा पती ॥४॥