भजनी मालिका
← भजनांकडे परत

विठोबा चला मंदिरांत । गस्त हिंडती बाजारांत

vithoba chala mandirant | gasta hindati bajarant

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
विठोबा चला मंदिरांत । गस्त हिंडती बाजारांत ॥१॥ रांगोळी घातली गुलालाची । शेज म्यां केली पुष्पांची ॥२॥ समुया जळती अर्ध रात्रीं । गळ्यांमध्यें माळ मोत्यांची ॥३॥ नामदेवाला सांपडलें माणिक । घेतलें जनीनें हातांत ॥४॥ घेउनी गेली राउळांत । गस्त हिंडती हकिमाची बाजारांत ॥५॥