भजनी मालिका

भजने

लांब लांब जटा काय वाढवूनि । पावडें घेऊनि क्रोधें चाले ॥१॥ खायाचा वोळसा शिव्या दे जनाला । ऐशा तापशाला बोध कैंचा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

लांब लांब तुम्हीं सांगाल गोष्टी । तत्त्वेंसी भेटी करी उठाउठीं ॥१॥ मीपण जोंवरी गेलें नाहीं । तोंवरी तुम्हीं केलें काई ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

लांबवूनि जटा नेसोनि कासोटा । अभिमान मोटा करिताती ॥१॥ सर्वांगा करिती विभूतिलेपन । पाहाती मिष्टान्न भक्षावया ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

लाभ अथवा हानी करितां व्यवसाय । आम्हां कते विपाय फळां आले ॥१॥ एका लाभा पात्र केलें तिहीं लोकीं । आम्हां नेलेंशेखीं ऐशा थरा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

लाभ जाला बहुतां दिसीं । लाहो करा पुढें नासी । मनुष्यदेहा ऐसी । उत्तमजोडी जोडिली ॥१॥ घेई हरीनाम सादरें । भरा सुखाचीं भांडारें । जालिया व्यापारें । लाहो हेवा जोडीचा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

लाभाचिया लोभें मज म्हणसी आपुलें । परी नेणसी तापलें चित्त माझें ॥१॥ जन्म मरण दुःखें शिणलों यातायाती । ऐसी माझी खंती न विचारिसी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

लाल कंबली वोढे पेनाये । मोसु हरीथें कैसें बनाये ॥१॥ कहे सखि तुम्हें करति सोर । हिरदा हरीका कठिन कठोर ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

लावण्य मनोहर प्रेमाचा पुतळा । देखिलासे डोळा दत्तराव ॥१॥ चरणीं घातली मिठी प्रेम दुनावें पोटीं । पाहतां हारपली दृष्टी दुजेपणा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

लावण्य सुंदर रूपानें बरवी । पापीण जाणावी ते कामिनी ॥१॥ देखतां होतसे संगाची वासना । भक्ताच्या भजना नाश होये ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

लाविली कौपीन पितांबरी एक । त्यागिली अनेक मह्त‌ माया ॥१॥ सव्या हातें घेतलें संतसाधुजनां । केली प्रदक्षिणा समाधीसी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

लावुनी आसन बैससी समाधी । तों तों उपाधी सहज लागे ॥१॥ नाममुखीं गातीं जोडे सायुज्यता । उपाधि तत्त्वतां दूरी पळे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

लावूनियां गोठी । चुकवूं आदरिली दिठी । देऊनियां मिठी । पळे महिया माथुले ॥१॥ पुढे तेची करी आड । तिचा लोभ तिसी नाड । उरवी चरफड । हात गोउनी पळावें ॥ध्रु॥

रचनाकार: संत तुकाराम