भजनी मालिका

भजने

लटिका तरी गाईन तुझेंचि नाम । लटिकें प्रेम आणीन तुझें ॥१॥ सहजचि लटिकें असे माझें ठायीं । तुझिया पालट नाहीं साचपण ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

लटिका तो प्रपंच एक हरी साचा । हरीविण आहाच सर्व इंद्रियें ॥१॥ लटिकें तें मौन्य भ्रमाचें स्वप्न । हरीविण ध्यान नश्वर आहे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

लटिका मी गाईन लटिका मी नाचेन । संतासि देखोन लटिका लवें ॥१॥ लटिका माझा भाव लटिकी माझी भक्ति । तूं तंव श्रीपती कृपासिंधु ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

लटिकियाच्या आशा । होतों पडिलों वळसा । होउनियां दोषा । पात्र मिथ्या अभिमानें ॥१॥ बरवी उघडली दृष्टी । नाहीं तरी होतों कष्टी । आक्रंदते सृष्टी । मात्र या चेष्टांनीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

लटिकें तें ज्ञान लटिकें ते ध्यान । जरि हरीकिर्तन प्रिय नाहीं ॥१॥ लटिका चि दंभ घातला दुकान । चाळविलें जन पोटासाठी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

लटिकें हासें लटिकें रडें । लटिकें उडें लटिक्यापें॥१॥ लटिकें माझें लटिकें तुझें । लटिकें ओझें लटिक्याचें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

लटिकेची साच दाविलें अचळ । पिडीतसे काळ किती म्हणू ॥१॥ सत्य तूं सत्य तूं सत्य तूं विठ्ठला । कां गा हा दाविला जगदाकार ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

लटिक्याचें आंवतणें जेविलिया साच । काय त्या विश्वास तोचि खरा ॥१॥ कोल्हांटिणी लागे आकाशीं खेळत । ते काय पावत अमरपद ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

लटिक्याचे वाणी वचनाचा संवाद । नांहीं कोणां वाद रुचों येत ॥१॥ अन्याय तो त्याचा नव्हे वायचाळा । मायबापीं वेळा न साधिली ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

लडिवाळ म्हणोनी निष्ठुर न बोला । परी सांभाळिला लागे घात ॥१॥ बहु वागवीत आणिलें दुरूनि । दासांची पोसनी बहु आहे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

लपलासी तरी नाम कैसें नेसी । आम्ही अहर्निशीं नाम गाऊं ॥१॥ आम्हांपासोनियां जातां नये तुज । तें हें वर्म बीज नाम घोकूं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

लंबोदरा तुझा शोभे शुंडादंड । करीतसे खंड दुश्चि-न्हांचा ॥१॥ चतुर्थ आयुधें शोभताती हातीं । भक्ताला रक्षिती निरंतर ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

लय लक्षी मन न राहे निश्चळ । मुख्य तेथें बळ आसनाचें ॥१॥ हें तों असाध्य जी सर्वत्र या जना । भलें नारायणां आळवि ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

लय लक्षूनियां जालों म्हणती देव । तो ही नव्हे भाव सत्य जाणा ॥१॥ जालों बहुश्रुत न लगे आतां कांहीं । नको राहूं ते ही निश्चितीनें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम