भजनी मालिका

भजने

लेखिलें कवित्व माझे सहज बोल । न लगे चि ओल जिव्हाळ्याची ॥१॥ नये चि उत्तर कांहीं परतोनि । झालों नारायणे न सरतें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

लोक फार वाखा अमंगळ जाला । त्याचा त्याग केला पांडुरंगा ॥१॥ विषयां वंचलों मीपणा मुकलों । शरण तुज आलों पांडुरंगा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

लोक विचारीती हरीसी हो जाण देशपांड्या नाही आला जाण ॥१॥ ऐकोनिया हरी ऐसे म्हणतो जाण आज पंद्रा दिनी येतो समोर ।।२।।

रचनाकार: संत विठाबाई

लोक सकळहि बाहेरी येती । तंव निर्मळ गगन शुध्द गभस्ती । नवा चारा धेनुवा चरती । आणि दुभती यथेष्ट ॥१॥ तंव गडी अवघे मस्तकावरी । धरुनियां होते गिरी । गर्वारुढ ते अंतरीं । आम्ही पर्वत उचलिला ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

लोकमान देहसुख । संपित्तउपभोग अनेक । विटंबना दुःख । तुझिये भेटीवांचूनि ॥१॥ तरी मज ये भेट ये भेट । काय ठाकलासी नीट । थोर पुण्यें वीट । तुज दैवें चि लाधली ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

लोकां कळों आला देव आम्हांमधीं । टाकिली उपाधि तिहीं शंका ॥१॥ शंका नाहीं थोरां लाहानां जीवांसि । कळला हा हृषीकेशी मग ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

लोकांचे हे पुत्र संसार करिती । आमुची फ़जिती होय जगीं ॥१॥ सांगतां नायके नाहीं कोणाचा धाक । पंढरीनायक धरिला मनीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

लोखंडाचा विळा परिसासी लाविला । मागिलिया मोला मागूं नये ॥१॥ दासी होती परि रायासी रतली । मागील ते बोली बोलें नये ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

लोपतां आदित्य पडे चंद्रप्रभा । वृंदावनीं शोभा सुशो-भित ॥१॥ देहुडा पाउलीं उभा तये वनीं । वेणू चक्रपाणी वाजवितो ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

लोभियाचे घरीं लटिकेचि उपवास । न मरे ह्रषिकेश म्हणती जगीं ॥१॥ तूं तंव भावाचा अंकुर जी देवा । लटिका मी पहावव दास तुझा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

लोभियानें धन केलें भूमिगत । दगडही थित घालूनी वरी ॥१॥ तैसे तुम्हीं देवा केलें आपणांसी । कळंक यशासी लावियला ॥२॥

रचनाकार: संत निळोबा