भजनी मालिका

भजने

लये लये लखोटा । मूळबंदि कासोटा । भावा केलें साहें । आतां माझें पाहें ॥१॥ हातोहातीं गुंतली । जीवपणा मुकली । धीर माझा निका । सांडीं बोल फिका ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

लवविलें तया सवें लवे जाती । अभिमाना हातीं सांपडेना ॥१॥ भोळिवेचें लेणें विष्णुदासां साजे । तेथें भाव दुजे हारपती ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

लहानाहूनि लहान न धरी अभिमान । तेणें हो कारण सर्व बापा ॥१॥ उंचपणें पाहतां वेळुचीये परी । लोहाळा अंतरीं नम्र होये ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

लाउनि मनगणीची दोरी विपरीत तयाची कुसरी । अकळून न कळे श्रीहरी । अवघे वोडंबर तुझें ॥१॥ अष्टदळकमळाची वोवरी । विपरीत तयाची कुसरी । एकविस खणांचे उपरी । बाहीजु कां हरी दाखविली ॥ध्रु०॥

लागली उन्मनी वैराग्याचे धुणी । जागा निरंजनीं निरंतर ॥१॥ भूचरी खेचरी चाचरीच्या छंदें । अगोचरीच्या नादें सहस्त्र दळीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

लागलें वरुष पांचवें बाळासी । खेळे तो मुलांसी नेटेंपाटें ॥१॥ पाहाती ते लोक विस्मय पावती । त्याची अंगकांती कोण वाणी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

लागूनियां पायां जना विनवीत । मुखीं बोला दत्त वारंवार ॥१॥ तेणें तुम्हां सुख होईल अपार । दत्त दयासागर आठवावा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

लागे तुझी सोय करी ऐसे कांहीं । माझे विठाबाई माऊलिये ॥१॥ पतितपावन म्हणविसी जरी । अव्हेर न करी तरी माझा ॥ध्रु॥

रचनाकार: संत तुकाराम

लागों नेदीं बोल पायां तुझ्या हरी । जीव जावो परि न करीं आण ॥१॥ परनारी मज रखुमाईसमान । वमनाहूनि धन नीच मानीं ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

लागोनियां पायां विनवितों तुम्हाला । करें टाळी बोला मुखें नाम ॥१॥ विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळां । हा सुखसोहळा स्वर्गी नाहीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

लाघवी सूत्रधारी दोरी नाचवी कुसरी । उपजवी पाळूनि संहारी नानापरिचीं लाघवें ॥१॥ पुरोनि पंढरिये उरलें भक्तीसुखें लांचावलें । उभें चि राहिलें कर कटीं न बैसे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

लांचावलें ब्रह्म भक्तीचेनि सुखें । गोकुळीं गोपाळवेशें गाई राखे ॥१॥ त्रिभुवनीं न समाये ब्रम्हादिकां लक्षा नये । तो दास्यत्व करिताह गौळीयांचें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव