भजनी मालिका
← भजनांकडे परत

लाभोनी हा जन्म मंत्रे कां फसावें

labhoni ha janma mantre kan phasaven

रचनाकार: संत जनार्दन · अभंग
लाभोनी हा जन्म मंत्रे कां फसावें । आंतचि रिघावें शरण गुरुसी ॥१॥ त्यजुनि शास्त्र शंका मान महत्व लज । वराव पुन्हा राजयोगीमंत्र ॥२॥ देववावा आधईं कांतेसी मग स्वयें । घ्यावा संप्रदाय उपदेश ॥३॥ करो नये विचार जरी आड येती । वाळवेही पती माता पिता ॥४॥ बुड्विती स्वहित तेचि साच वैरी । नेती यमपुरी पुर्वजेंसी ॥५॥ खोवाव कां तारुं अक्षय ब्रह्मदाता । जन्मीचेया कांता पती सर्व ॥६॥ झाले जे अनन्य राजयोगीयांसी । नलगे तयासी करणें योग ॥७॥ होवोनि जीवें दासी राजयोगीयाची । पावावें पद तें ची तयासंगे ॥८॥ नाहीं भरंवसा आयुष्य बुडबुडा । नाशायां बापुडा मग म्हणे ॥९॥ सांगे गुरु तेंचि करावें सर्व देहें । हें करी नोहे हें म्हणे नये ॥१०॥ गात्र शक्ती तारुण्य इंद्रिये जंव तंव । व्हावे देहें देव नोहे मग ॥११॥ म्हणे जनार्दन सदुरुपायी लोटी । उघडी भ्रमताटी एकनाथा ॥१२॥