भजनी मालिका
← भजनांकडे परत

लावुनि काहाळा । सुखें करितों सोहोळा

lavuni kahala | sukhen kariton sohola

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
लावुनि काहाळा । सुखें करितों सोहोळा ॥१॥ सादावीत गेलों जना । भय नाहीं सत्य जाणां ॥ध्रु.॥ गातां नाचतां विनोदें । टाळघागरीयांच्या छंदें ॥२॥ तुका म्हणे भेव । नाहीं पुढें येतो देव ॥३॥