भजनी मालिका

भजने

लोह कफ गारा सिद्ध हे सामुग्री । अग्नी टणत्कारी दिसों येतो ॥१॥ सांगावें तें काई सांगावें तें काई । चित्ता होय ठायीं अनुभव तो ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

लोह तांबे सोनें । रुपें माती पाषाण । टवाळी भिन्न भिन्न । निर्मित होती ॥१॥ वाती स्नेह भरती । पदार्थ वेगळे दिसती । परि तयामाजी ज्योती । असे एकरुप ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

लौकिकापुरता नोहे हा विभाग । साधलें अव्यंग सुखसार ॥१॥ अविट विटेना बैसलें वदनीं । नाम संजीवनीं ध्यानीं मनीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

लौकिकापुरती नव्हे माझी सेवा । अनन्य केशवा दास तुझा ॥१॥ म्हणऊनि करीं पायांसवें आळी । आणीक वेगळी नेणें परी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

लौकिकासाठी या पसाऱ्याचा गोवा । कांहीं नाहीं देवा लागों येत ॥१॥ ठेवावा माथा तो नुचलावा पायीं । ठांयींचिये ठांयीं हालों नये ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

वक्त्या आधीं मान । गंध अक्षता पूजन । श्रोता यति झाला जाण । तरी त्या नाहीं उचित ॥१॥ शीर सर्वांगा प्रमाण । यथाविधि कर चरण । धर्माचें पाळण । सकळीं सत्य करावें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

वचन तें नाहीं तोडीत शरीरा । भेदते अंतरा वज्रा- ऐसें ॥१॥ कांहीं न सहावें काशा हि करणें । संदेह निधान देह बळी॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

वचनांचे मांडे दावावे प्रकार । काय त्या साचार कौतुकाचे ॥१॥ जातां घरा मागें । उरों नेणें खंती । मिळाल्या बहुतीं फांकलिया ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

वचनें चि व्हावें आपण उदार । होईल विश्वंभर संपुष्ट चि ॥१॥ सत्यसंकल्पाचीं फळें बीजाऐसीं । शुद्ध नाहीं नासी पावों येत ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

वटारोनि डोळे पाहती आकाश । मज त्याचा भासा कळों नेदी ॥१॥ भाजा भाजा म्हणोनि उठली एकसरांज । मग म्यां बाहेरां गमन केलें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव