भजनी मालिका

भजने

लाज वाटे जीव करी तळमळ । चिंते वक्षस्थळ व्यापियेलें ॥१॥ पडिलों निढळ न सुचेचि विचार । तुम्हीं तों निष्ठुर धरियेलें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

लाज वाटे पुढें तोंड दाखवितां । परि जाऊं आतां कोणापाशी ॥१॥ चुकलिया कामा मागतों मुशारा । लाज फजितखोरा नाहीं मज ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

लाज वाटे मज मानिती हे लोक । हें तों नाहीं एक माझे अंगी ॥१॥ मोजुनि झिजलों मापाचिया परी । जाळावी हे थोरी लाभाविण ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

लाज सांडोनियां जालों शरणागत । ऐसियाचा अंत पाहसी झणीं ॥१॥ गुण दोष माझे मनीं गा न धर । पतितपावन जरी म्हणविसी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

लाजविली सेवा लाजाविली भक्ति । वैराग्य विरक्ति लाजविली ॥१॥ ऐसाचि घडोनि आला हा प्रसंग । हांसविलें जग आपुल्या ब्रीदा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

लाजों नको मना हरीच्या कीर्तना । संसार पाहुणा दो दिवसांचा ॥१॥ कंठीं नाहीं आइती ह्मणोनि सांडूं नको ज्योति । इतुकिये प्रांती पडूं नको ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

लाजोनियां काळें राहिलें लिखित । नेदितां ही चित्त समाधान ॥१॥ कैसें सुख वाटे वचनाचे तुटी । प्रीतिविण भेटी रुचि नेदी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

लाटिक्या भूताची लटिकी भूतबाधा । झाली करवी खेदा जाणतिया ॥१॥ तैसें तुम्हां केलें माझिया संचितें । देवपणहि थितें ही रचिलें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

लाडाच्या उत्तरीं वाढविती कलहे । हा तो अमंगळ जातिगुण ॥१॥ तमाचे शरीरीं विटाळ चि वसे । विचाराचा नसे लेश तो ही ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

लाडिके विठोबाचे आम्हीं । गाऊं नित्यनेमीं नाम तुझें ॥१॥ उत्तम उत्तम साधन हें नाम । गांता प्रेम वाटे जीवीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

लापनिकशब्दें नातुडे हा देव । मनिंचे गुह्य भाव शुद्ध बोला ॥१॥ अंतरिंचा भेद जाणे परमानंद । जयासी संवाद करणें लागे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

लांब लांब काय सांगशील गोष्टी । करा उठाउठी निरभिमान ॥१॥ मी तूं पण जंव दंभ गेला नाहीं । साधिलें त्वां न कांहीं तत्त्वसार ॥२॥

रचनाकार: संत नामदेव