भजनी मालिका
← भजनांकडे परत

लांब लांब तुम्हीं सांगाल गोष्टी । तत्त्वेंसी भेटी करी उठाउठीं

lamb lamb tumhin sangal goshti | tattvensi bheti kari uthauthin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
लांब लांब तुम्हीं सांगाल गोष्टी । तत्त्वेंसी भेटी करी उठाउठीं ॥१॥ मीपण जोंवरी गेलें नाहीं । तोंवरी तुम्हीं केलें काई ॥२॥ मीपण देहीं प्रपंच दृष्टी । कोरड्या काय सांगाल गोष्टी ॥३॥ एका जनार्दनीं बांधावें सत्य । बोलामाजीं तेणेंक दाखविलें तत्त्व ॥४॥