भजनी मालिका
← भजनांकडे परत

लांबवूनि जटा नेसोनि कासोटा । अभिमान मोटा करिताती

lambavuni jata nesoni kasota | abhiman mota karitati

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
लांबवूनि जटा नेसोनि कासोटा । अभिमान मोटा करिताती ॥१॥ सर्वांगा करिती विभूतिलेपन । पाहाती मिष्टान्न भक्षावया ॥२॥ तुका म्हणे त्यांचा नव्हे हा स्वधर्म । न कळतां वर्म मिथ्यावाद ॥३॥