भजनी मालिका
← भजनांकडे परत

लालुचाईसाठीं बळकाविसी भावा

laluchaisathin balakavisi bhava

लालुचाईसाठीं बळकाविसी भावा । परि मी जाण देवा जिरों नेदीं ॥१॥ असों द्या निश्चय हा मनीं मानसीं । घातली येविशीं दृढ कास ॥२॥ मज आहे बळ आळीचें सबळ । फोडीन अंतराळ हृदय तुझें ॥३॥ करुणारसें तुकयाबंधु म्हणे भुलवीना । काढून घेईना निज वस्तु ॥४॥