भजनी मालिका

भजने

लावूनियां नेत्र सदा समाधिस्थ । आठवी अनंत ह्रदयामाजीं ॥१॥ नाहीं देहावरी रुपीं जाहला मग्न । नाचे उडे पूर्ण विठ्ठलनामें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

लावूनियां मुद्रा बांधोनियां कंठीं । हिंडे पोटासाठी देशोदेशीं ॥१॥ नेसोनि कोपीन शुभ्रवर्ण जाण । पहाती पक्वान्न क्षेत्रींचें तें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

लावोनि भवभयें तुवां केलें साचें। देह नव्हे याचें ऐसें केलें ॥१॥ सुखभोग सर्व दिला टाकोनियां नेणें तुझ्या पायांपरतें कांहीं ॥ २॥

रचनाकार: संत गोणाई

लावोनि भवभयें तुवां केलेंज साचें । देह नव्हे याचें ऐसें केलें ॥१॥ सुखभोग सर्व दिला टाकोनियां । नेणें तुझ्या पायांपरतें कांहीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

लाहे लाहे सोडीत गोधनें । भोंवतें गोपाळ वेष्टित तारांगणें । शोभला तो बाळवेषें परिपुर्ण । वेधु लाविला आम्हांसी तेणें वो ॥१॥

रचनाकार: संत एकनाथ

लिंगपुरानीं हा बोलिला इतिहास । तोचि म्यां तु-म्हांस निवेदिला ॥१॥ अनेक पुराणीं अनेक प्रकार । ताराक्या नर नारी लोक ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

लिहिलें संचितीं न चुके कल्पांतीं । वायां कुंथाकुंथीं करूनी काय ॥१॥ जन्ममरण सुखदु:खाचें गांठोडें । हें तों मागें पुढें बांधलेंसे ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

लीळाविग्रही तो लेववी खाववी । यशोदा बैसवी मांडीवरी ॥१॥ मांडीवरी भार पुष्पाचिये परी । बैसोनियां करी स्तनपान ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

लेकरा आईतें पित्याची जतन । दावी निजधन सर्व जोडी ॥१॥ त्यापरि आमचा जालासे सांभाळ । देखिला चि काळ नाहीं आड ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

लेंकरा लेववी माता अळंकार । नाहीं अंतपार आवडीसी॥१॥ कृपेचें पोसणें तुमचें मी दीन । आजि संतजन मायबाप ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

लेकराची आळी न पुरवी कैसी । काय तयापाशीं उणें जालें ॥१॥ आम्हां लडिवाळां नाहीं तें प्रमाण । कांहीं ब्रम्हज्ञान आत्मिस्थति ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

लेकुराची आळी मायबापापुढें। पुरवी लाडे कोडे लळे त्याचें ॥१॥ करावा सांभाळ सर्वस्वी गा आतां । कांहो अव्हेरितां जवळीचा ॥२॥

रचनाकार: संत सेना

लेंकुरातें बाप खेळवी साचें । बाईल देखतां ती पुढें नाचे ॥१॥ माझां बाप माझी आई । बाईल देखतां नाचतो पायीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ