भजनी मालिका
← भजनांकडे परत

लाविली कौपीन पितांबरी एक । त्यागिली अनेक मह्त‌ माया

lavili kaupin pitambari ek | tyagili anek mahta‌ maya

रचनाकार: संत नामदेव · अभंग
लाविली कौपीन पितांबरी एक । त्यागिली अनेक मह्त‌ माया ॥१॥ सव्या हातें घेतलें संतसाधुजनां । केली प्रदक्षिणा समाधीसी ॥२॥ समाधीचे पाळी निवृत्ती वनमाळी । अतरीं कळवळी मुक्ताबाई ॥३॥ आणिकांच्या डोळां अश्रुपात येत । होईल कीं गुप्त योगिराज ॥४॥ चांगदेवा दिधलीं विठोबाचीं पाऊलें । तीर्थ तें घेतलें देवगुरूचें ॥५॥ नामा म्हणे हरि जाली आळवण । करा बोळवण चांगोबाची ॥६॥