भजनी मालिका

भजने

लंकाबंदी पडले देव । सुटका चिंतिताती सर्व ॥१॥ रामा रामा रामा दशकंठनिकंदन रामा । भवबंधविमोचना तारी । कृपा करी हो मेघःश्यामा ॥धृ॥

रचनाकार: संत एकनाथ

लंकेमाजी घरें किती तीं आइका । सांगतसें संख्या जैसीतैसी ॥१॥ पांच लक्ष घरें पाषाणांचीं जेथें । सात लक्ष तेथें विटेबंदी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

लक्ष गांवें तरणी । पृथ्वी व्यापी निज करणीं । तो साक्षी अलिप्तपणीं । जोथींच्या तेथें ॥१॥ तैसा आत्म देहीं । म्हणती त्यासी ज्ञान नाहीं । तो व्यापुनी सर्वा ठायीं । साक्षत्व असे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

लक्षवरी बिल्वदळें माथा वाहे । आनंद न समाये महादेवा ॥१॥ बहुता काळाचें तेथें एक लिंग । होतें भूमिभाग होऊ-नियां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

लक्षांचे जें लक्ष तो दिसे अलक्ष । तो असे प्रत्यक्ष नंदाघरीं ॥१॥ बाळरुप गोजिरें वाळे वांकी साजिरें । पाहतां दृष्टीचे पुरे कोड सर्व ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

लक्षूनियां योगी पाहाती आभास । तें दिसे आम्हांस दृष्टीपुढें ॥१॥ कर दोनी कटी राहिलासे उभा । सांवळी हे प्रभा अंगकांती ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

लखलखिलें सुतेज माझिया नयनापुढें । चतुर्भुज रुपडें मेघश्याम ॥१॥ तेणेंचि वेधिलें हदईचि राहिलें । मागें पुढें ठेले वेष्ठुनियां ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

लगोरिया मांडूनि पोरा वांटशील गडी । निर्बळाच्या संगे डाव देतां येसी रडी ॥१॥ न करीं ऐसें आतां । करीं गडी श्रीअनंता ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

लग्नाचा सोहळा यथासांग जाहला । नामा वेगीं आला पंढरीसी ॥१॥ देऊनियां सर्व पाहती संपदा । येथें तो आपदा न मिळे आन ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

लचाळाच्या कामा नाहीं ताळावाळा । न कळे ओंगळा उपदेश ॥१॥ वचनचर्येची न कळे चांचणी । ऐसी संघष्टनी अमंगळ ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

लज्जा अभिमान टाकूनि परता । परमार्थ सरतां करी कां रें ॥१॥ वादक निदक भेदक ऐसें त्रिविध । याचा टाकूनि भेद भजन करी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

लटकीयाची आण । लटिकेंचि प्रमाण । ऎसीयासी कोण । विश्वासेल ॥१॥ मागतां बळें बळी । उदकीं देत चळी । अतिशय तळमळी । मीन जैसा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ