भजनी मालिका

भजने

रुपाचें रुपस नाम ह्रषिकेश । पंढरी निवास जप करी ॥१॥ विठ्ठल श्रीहरी मुकुंद श्रीहरी । नामेंचि बोहरी प्रपंचाची ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

रुपीं गुंतलीं मानसें । ध्यानीं मुनिजनां ज्याचें पिसें । तेंचि हें सुंदर स्वरुप कैसें । धरिलें भक्त कैवारा ॥१॥ अंगी चंदनाची उटी । तुळशी माळाहार कंठी । बुका शोभला लल्लाटीं । रत्नें मुगुटीं झळकती ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

रुसलों आह्मीं आपुलिया संवसारा । तेथें जनाचारा काय पाड ॥१॥ आम्हां इष्ट मित्र सज्जन सोयरे । नाहीं या दुसरें देवाविण ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

रूप तेंचि नाम नाम तेंचि रुप । अवघा संकल्प एकरुप ॥१॥ पहातां पहाणें हरपलें देहीं । देहचि विदेही होउनी ठेलों ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

रूप नांव माया बोलावया ठाव । भागा आले भाव तयापरि ॥१॥ सींव वाटे परी न खंडे पृथिवी । शाहाणे ते जीवीं समजती ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

रूपें गोविलें चित्त । पायीं राहिलें निश्चिंत ॥१॥ तुह्मीं देवा अवघे चि गोमटे । मुख देखतां दुःख न भेटे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

रूपें शाभसुंदर निलोल्पल गाभा । सखीये स्पप्नीं शोभा देखियेली ॥१॥ नेत्र विशाळ भाळ दंत हीरया ज्योती । बाइये मदनमूर्ती देखियेला ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

रूपें सुंदर सांवळा गे माये । वेणू वाजवीं वृदांवना गोधनें चारिताहे ॥१॥ रुणझुण रुणझुण वाजवी वेणु । वेधीं वेधलें आमुचें तनमुन वो माये ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

रेखिले निढळीं केशरीं टिळक । तयावरी कस्तुरी परम सुरेख । उत्तम कुंकूं जाउळीं देख । लाविलिया आरक्त अक्षता ॥१॥ मग तो चंदन मलयागर । चर्चिला सुवासित अति परिकर । यावरी काढुनी सुमनाहार । उभयतां कंठीं ओपिले ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

रोकेडेंचि ब्रह्मा ब्रह्माज्ञानाचें गोठलें । तें उभें असे ठेल पंढरीये ॥१॥ नये अनुमाना वेदांत सिद्धातियां । मा ब्रह्माज्ञानिया कोण पुसे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

रोजकीर्द जमा धरुनी सकळ । खताविला काळ वरावरी ॥१॥ नाहीं होत झाड्यापाड्याचें लिगाड । हुजराती ते गोड सेवा रूजू ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम